एक झुंज वादळाशी

सर्व काही खूप छान आहे असं आपल्याला वाटत असतानाच काही विपरीत घडून जातं. असं काहीतरी ज्यानें आपलं आयुष्य एका क्षणात बदलून जाते।
2 डिसेंबर शनिवार, गौरव नेहमी प्रमाणे आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायला गेला। मी अंश ला सुट्टी म्हणून सकाळी 7 वाजता उठले, दोघ मुलं ही माझ्या सोबत झोपून उठले। गौरव आला कि आपण सोबत चहा घेऊ म्हणून त्याची वाट बघत होते।
तेवढ्यात माझ्या मैत्रिणी चा फोन आला, गौरव च्या तब्बेती ची चौकशी करत होती। मी म्हंटलं तो बरा आहे आणि खेळायला गेला आहे। ती म्हणाली नाही माझ्या नवऱ्याचा फोन आला होता कि आम्ही उशिरा येऊ कारण गौरव ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे।
मला काही कळायला मार्ग नव्हता। थोड्या वेळाने माझे शेजारी घरी आले कि तू पण हॉस्पिटलमध्ये चल। मला काहीही कळत नव्हतं कि काय घडतंय।
मी तिथे गेल्यावर समोरच गौरव CCU मधे होता।  डॉक्टर ने  मला बोलवून सांगितले कि त्याला massiv cardiac arrest झाला आहे आणि ताबडतोब अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे। अंजिओग्राम केल्यावर समजलं त्याला 2 ब्लॉकेज आहे। ताबडतोब अँजिओप्लास्टी चा आम्ही निर्णय घेतला। खरं तर हा प्रसंग असा आपल्यावर ओडून आला आहे हे कळल्यावर मला काही सुचत नव्हतं। डॉ नी जे काही सांगितले ते अविनाश दादा यांनी च ऐकलं, यांनी च निर्णय घेतला।

सगळ्या प्रकारामुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्याला अश्या वेळी खुप खंबीरपणे उभे राहावे लागते। खंबीर आपल्या 8 वर्षाच्या मुला साठी, रोज उठल्यावर बाबा म्हणून हाक मारणाऱ्या 1 वर्षाच्या गीतांवि साठी।मोठ्या मुलाला असं  पाहून खचून जाणाऱ्या वयोवृद्ध सासू सासऱ्यांसाठी। एक वर्षात 2 अपघातातून न सावरलेल्या आपल्या आई साठी।

गौरव ला खेळतांना जाणवलं होत कि त्याला काही तरी त्रास होतोय आणि हे काही साधारण नाहीये। त्यानी लगेच त्याच्या मित्रांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले। तिथे पोहचोवस्तवर त्यानी स्वतः चा भान हरपून जाउ दिला नाही।

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्या पासून गौरव ला डिस्चार्ज मिळण्या पर्यंत सगळे मित्र प्रत्येक वेळी पुरेपूर काळजी घेत होते। गौरव चा मित्र सुशांत यानी पुढचा मागचा काही ही विचार न करता त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स पैशे भरले आणि मेडिकल इन्शुरन्स च्या सगळ्या औपचारिकता पार पाडण्यात त्याच्याच मित्रा ची अर्थात राजेश ची खूप मदत झाली।

हे सगळं करत असतानाच सुहास दादा आणि अविनाश दादा मोठ्या भावा सारखे माझ्या पाठीशी उभे होते। मी माझ्या कडे दुर्लक्ष करित असतांना त्यांनी माझी पुरेपूर काळजी घेतली। कदाचित माझ्या सख्या मोठ्या भावाने पण इतके केले नसते। आणि घरी मला साथ दिली बहिणी सारख्या माझ्या मैत्रिणी मृणाल ताई, स्नेहा आणि वर्षा। माझ्या घरून कोणी येऊ पर्यंत दोघा मुलांची यथायोग्य काळजी घेतली। मी त्यांच्या कडून निश्चिंत झाले।

या वादळाशी झुंझ देतांना मला काही गोष्टींची जाणीव झाली ती

◆आपल्याला जेंव्हा ही आपल्या शरीरात काही अनपेक्षित घडून राहिलं आहे असं वाटल्यास घरगुती उपचार न करून त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे अत्यावश्यक आहे।

◆अश्या वेळेस खचून न जाता रुग्ण व्यक्ती नी हिम्मत दाखवणे गरजे च आहे।

◆वयाची 35शी उलटली कि वार्षिक तपासणी करून घ्यायला हवी।

◆मुलींनी प्रत्येक  संकटाला खंबीरपणे सामोरे जावं

◆ आर्थिक व्यवहारांची नीट माहिती असलीच पाहीजे, म्हणजे कुठे काय औपचारिकता आहे हे लक्षात येतं आणि आयत्या वेळी धांदल उडत नाही।

◆ स्वावलंबन असणे अत्यंत आवश्यक आहे। घरात चार चाकी उभी असतांना मी मात्र हॉस्पिटलमध्ये जायला अवलंबून होते। म्हणून नाताळच्या सुट्टीत ड्राइविंग चे धडे पुन्हा एकदा गिरवून घेतले।

◆ माणुसकी हा खूप मोठा गुण अंगी असावा। बाबा म्हणायचे जिथे माणसांची गरज असते तिथे पैसा काही कामाला येत नाही। म्हणून माणसं जोडून ठेवा। माझे शेजारी हे सगळे माझी जोडलेली माणसं आहे जे संकटाच्या वेळी धावून आले।

Comments 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *